Breaking News

कोरोना संकटात शोएबची भारतीयांसाठी प्रार्थना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे आणि त्यामुळे दररोज रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाची व्यवस्थाही तुटपुंजी पडत आहे. ऑक्सिजनअभावी लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे. या वेळी भारताच्या मदतीसाठी अनेक शेजारील राष्ट्रही पुढे येत आहेत. त्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानेही भारतीयांना धीर दिला आहे.
शोएब अख्तरने ट्विट केले की, भारतातील नागरिकांसाठी मी प्रार्थना करतो. परिस्थितीत लवकरच सुधारणा होईल अशी मी अपेक्षा करतो आणि भारत सरकार या संकटाशी मुकाबला करेल. या कठीण काळात आपण सर्व एकत्र आहोत.
दरम्यान, याआधी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये जानेवारी महिन्यात लागलेल्या आगीत चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबतही शोएबने दु:ख व्यक्त केले होते. 

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply