रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 19) राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सापांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे सापांविषयी माहिती देण्यात आली. त्यामध्ये नाग, घोणस, ़फुर्श्या आदी विषारी सापांचा समावेश होता तर धामण, मांडूळ आदि बिनविषारी सापांविषयी सर्पमित्र प्रथमेश राक्षीकर, नीरज म्हात्रे व नितेश लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्राध्यापक अनिरुद्ध मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, प्रा. सतीश सावळे, प्रा. नेहल प्रधान, प्रा. रेश्मा शेळके, प्रा. जयवंती अडळीकर यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper