Breaking News

कोलाड येथील धर्माधिकारी महाविद्यालयात शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात

रोहे : प्रतिनिधी

तालुक्यातील कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. 6) छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रा. अडलीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या 348 व्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे,  राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. अनिरुद्ध मोरे, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख प्रा. सूर्यकांत आमलपुरे, विज्ञान प्रमुख प्रा. रेश्मा शेळके यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply