नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. 5) कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्हवर आपले विचार मांडणार आहेत. यात भारत कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात डिजिटल पब्लिक गुडच्या रूपात कोविनला ऑफर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणने दिली. जगभरातील देश सध्या कोविड-19 विषाणू संसर्गाचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी कोविन अॅपसंदर्भात आपले विचार मांडणार असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. लसीकरण हे कोरोनाविरोधात सर्वांत मोठे हत्यार आहे. कोविन या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म जगभरात खुला करण्यासाठी भारत ऑफर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper