पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात प्रथमच क्रांतीवीर महोत्सव सुरु करण्यात आला आहे. हा महोत्सव 15 ते 20 जानेवारी पर्यंत असणार आहे. या महोत्सवाच्या दुसर्या दिवशी जिल्हा परिषद सदस्या राजश्री भोपी आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी यांनी भेट दिली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शिरढोण येथे आयोजीत केलेल्या ‘क्रांतीवीर महोत्सवाच्या दुसर्या दिवशी सुप्रसिद्ध आगरी झु झु किंग रणजित ठाकुर, लिंबु कापला फेम गायक मयुर नाईक यांची प्रमुख पाहुणेे म्हणुन उपस्थिती लाभली होती. या वेळी तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, भिरवले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राम हातमोडे, शिरढोणच्या सरपंच संजना कातकरी, उपसरपंच निकीता चौधरी, प्रमोद कर्णेकर, विजय भोपी, रेश्मा वाजेकर, संगिता चौधरी, रेश्मा वाजेकर, महोत्सवाचे आयोजक मंगेश वाकडीकर, प्रितेश मुकादम, विजय भोपी, निलेश भोपी, सुशांत वेदक आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper