मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीमधील खोकरी येथे राहणार्या एका आदिवासी व्यक्तीने जेवण बनविले नाही याचा मनात राग ठेवत आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी पती उमेश रमेश वाघमारे (वय 26) याच्यावर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजपुरी खोकरी परिसरात अब्दुल रहिमान यांचा फार्महाऊस आहे. या फार्महाऊसची देखरेख करण्यासाठी त्यांनी एक आदिवासी जोडपे ठेवले होते. यातील पती उमेश वाघमारे हा कामावरून आला असताना त्याने जेवण मागितले, मात्र त्याची पत्नी कुंदा वाघमारे हिने जेवण बनवले नव्हते. याचा राग मनात ठेवत आरोपी उमेशने पत्नीचा गळा आवळून खून केला. याबाबतची फिर्याद किशोर वाघमारे यांनी मुरूड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
Check Also
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा …
RamPrahar – The Panvel Daily Paper