Breaking News

खंडाळा घाटात दोन अपघात

चार गंभीर तर आठजण किरकोळ जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी (दि. 19) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चारजण गंभीर जखमी तर आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

एक्सप्रेस वेवरून चाललेल्या ट्रकला पाठिमागून आलेल्या कारने शनिवारी सकाळी सात वाजता धडक दिली. या अपघातात कारमधील तिघेजण जखमी झाले असून त्यातील दोघांना गंभीर इजा असल्याने त्यांना तातडीने निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात नेण्यात आले. तर अन्य एकावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

दुसरा अपघात मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील शिंग्रोबा मंदिरजवळ सकाळी साडे सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान झाला. पिंपरी चिंचवड परिसरातले 17 जण मिनी बस (एमएच-14, सीडब्ल्यू-3040) ने अलिबाग येथे पर्यटनासाठी जात होते. शिंग्रोबा मंदिराच्या पाठिमागील पर्यायी रस्त्यावरील उतावरून खोपोलीकडे येताना चालकाचे नियंत्रण सुटून मिनीबस रस्त्याखाली उतरली व उलटली.

या अपघातात मिनीबसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कामोठ येथील एमजीएम रुग्णालयात  नेण्यात आले आहे. तर सात किरकोळ जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपघाताचे वृत्त समजताच बोरघाट पोलीस यंत्रणेची संपूर्ण टीम, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमने तत्काळ घटनास्थळी जावून मदत केली.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply