पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथे झालेल्या आठव्या रायगड जिल्हा युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत खांदा कॉलनीतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रत्येकी तीन सुवर्ण व रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण सात पदके जिंकली. विजेत्यांची 27 व 28 जुलै रोजी कोल्हापूर येथे होणार्या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत हर्षदा मोकल, पंक्ती पाठक, अनिरुद्ध खरात यांनी सुवर्णपदक, विघ्नेश पाठक, ओम पिसाळ, संयोगीता मोकल यांनी रौप्यपदक; तर आदित्य कापडोस्कर याने कांस्यपदक पटकाविले.
संघटनेचे सचिव डॉ. मंदार पनवेलकर, रायगड अध्यक्ष सागर कोळी, युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय
स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना सेन्सेई चिंतामणी मोकल, प्रतीक कारंडे, अर्जुन लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
RamPrahar – The Panvel Daily Paper