Breaking News

खांदा कॉलनीत महिला मेळावा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वामी विवेकानंद मानवसेवा बहुउद्देशीय संस्था अंतर्गत महिला सक्षमीकरण विभागामार्फत बचत गट महिला मेळावा व तिळगुळ समारंभाचे आयोजन शनिवारी(दि. 28) खांदा कॉलनी सेक्टर येथे करण्यात आले होते. या समारंभाचे आयोजन सुहासिनी केकाणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.
या समारंभअचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते झाले. या मेळाव्या अंतर्गत महिला बचत गटांना व स्वतंत्र व्यावसायिक महिलांना 28 आणि 29 जानेवारीला मोफत स्टल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. या वेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, चंद्रकला शेळके, राजश्री वावेकर, सुशीला घरत, नीता माळी, गीतांजली ठाकूर, उद्योजिका सारिका माळी, प्रेमा भोपी, महिला मोर्चा खांदा कॉलनी शहर अध्यक्षा राखी पिंपळे, पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, सोनिया शितोळे, कविता पाटील, डॉ. योगेंद्र कोलते आदी महिला उपस्थित होत्या.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply