पनवेल : रामप्रहर वृत्त
खांदा कॉलनी सेक्टर 13 येथे नव्याने साई आर्ट हे साईन बोर्डे मीन्युफॅक्चररचे कार्यालय सुरू झाले आहे. मंगेश ठाकूर यांनी सुरू केलेल्या नवीन व्यवसायाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) झाले. या वेळी त्यांनी मंगेश ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, एकनाथ गायकवाड, कामगार आघाडीचे पनवेल शहर अध्यक्ष मोतिलाल कोळी, भिमराव पोवार, गणेश पवार, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवि जोशी, युवा मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, अनंत कांबळे, प्रवीण भोसले, संजय कांबळे, राहुल कांबळे, प्रविण पाटील, ऋषिकेश साबळे, राहुल पोवार, रोहित कोळी, अतिष पाटील, प्रदीप इंगळे, विजय कदम, रोहण भगत, अनंता ठाकूर, संतोष इंगळे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper