
कळंबोली ः प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून दिवसेंदिवस नवीन रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडत आहे. अर्सेनिक अल्बम-30 औषधामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंबांना मोफत अर्सेनिक अल्बम -30 गोळ्या व मास्कचे वाटप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका कुसुम गणेश पाटील व माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या माध्यमातून खांदा कॉलनीमध्ये करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा उपक्रम राबविण्याचे काम कुसुम पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जारी करण्यात आली आहे. या टाळेबंदीत कोणावरही उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विचारांचा पगडा पडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसुम पाटील व माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या माध्यमातून गरीब, गरजू, बेघर, निराधारांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मंगळवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खादा कॉलनीमधील सर्व नागरिकांना केंद्रीय मंत्रालयाच्या आयुष्य मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक या कोरोनाविरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्या गोळ्या व मास्कचे वाटप करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आदेशानुसार परिसरात यापुढे विविध आरोग्य उपक्रम राबविले जातील, अशी माहिती नगरसेविका कुसुम पाटील यांनी दिली. या वेळी भागूराम घाटे, गोपीनाथ लोखंडे, मुरलीधर शिंदे, हनुमंत गवळी, संतोष धनावडे, राजू महापूरकर, तुकाराम कुरळे आदी मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper