Breaking News

खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये पारितोषिक वितरण, सामाजिक संमेलन उत्साहात

मान्यवरांची लाभली उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 20) वार्षिक पारितोषिक वितरण आणि सामाजिक संमेलन मोठ्या उत्साहात झाले. त्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळेच्या प्रांगणात रंगीलो भारत ः भारताच्या शाश्वत आत्म्याचा उत्सव या आकर्षक संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक विविधतेचे आणि एकतेचे दर्शन घडवले.
संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, शकुंतला ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुरवे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, अर्चना ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, माजी नगरसेवक आरती नवघरे, नेत्रा पाटील तसेच कीर्ती नवघरे, किरण पाटील, दीपक शिंदे, अमर उपाध्याय, नितेश पाटील, प्रवीण बेरा, स्वप्नील ठाकूर, अमोघ ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
या वेळी नर्सरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, लोकगीते, नाट्यछटा आणि संगीत यांच्या माध्यमातून भारतातील विविध राज्यांची संस्कृती रंगमंचावर साकारली. सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच शैक्षणिक, क्रीडा व सहशालेय उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या 33 गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये 15 जणांनी आयआयटी, सात जणांनी एमबीबीएस, तीन जणांनी बीडीएस आणि एक विद्यार्थ्याने नॅशनल डिफेन्स अकॅडमीमार्फत भारतीय हवाई दलात प्रवेश मिळवला आहे. याशिवाय सात क्रीडापटूंनी सीबीएससी राष्ट्रीय स्पर्धा, राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स व तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये यश मिळवले आहे. सर्व गुणवंतांना प्रत्येकी 10 हजार रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply