Breaking News

खारघरमधील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त

युवा प्रेरणा सामाजिक संस्था व माहेश्वरी प्रगती मंडळ, खारघर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी सलग बारावे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 81 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला, तसेच परिसरातील नागरिकांसाठी साईदृष्टी डव्हान्स सेंटर फॉर परफेक्ट व्हिजन, सानपाडा या हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. नेत्र चिकित्सा शिबिरात डॉ. राजपाल उसनाळे यांनी अनेक नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली व डोळ्या संबंधित आजारांबद्दल मार्गदर्शन केले. शिबिरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते रक्तदात्यांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांनी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या शिबिरास व सामाजिक कार्याबद्दल त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील, दिलीप जाधव, भरत कोंढाळकर, कुणाल देवकर, गोपाल राजपूत, संदीप ठाकरे, ललित बडोदेकर, आदित्य हाटगे माहेश्वरी प्रगती मंडळ खारघरचे जय डागा, आशीष मनीयार, सतीश मुंदडा, मंगेशजी सिकची, अमित भांगडे, सचिन सोनी, आशीष शारदा, डॉ. राकेश सोमानी, गीतेश कोठारी सोमन मालाणी आदींनी आयोजनासाठी मेहनत घेतली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply