खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ’नेचर क्ल्ब’विभागाच्या वतीने शनिवारी (दि. 8) ऑनलाइन भित्तीपत्रिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मराठे आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे व इतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी आयोजित स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनीनी आपल्या विविध रचना आणि कला-गुणांचे प्रदर्शन करून विविध भित्तीपत्रिका सादर केल्या.
ही स्पर्धा ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्तम प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे आयोजन नेचर क्ल्ब विभागाच्या अध्यक्ष प्रा.सफिना मुकादम यांनी केले. तसेच प्रा. सानिया नाचन, प्रा. भरत सोलंकी यांनी सहकार्य केले. प्रा. स्नेहा चोगले यांनी या स्पर्धेचे निरिक्षण केले.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper