Breaking News

खारघरमध्ये घरफोडीच्या घटना

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून रहिवाशांशी संवाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघर शहरात शुक्रवारी रात्री 10 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली गेली. खारघरच्या वास्तू विहार येथील संस्कृती को-ऑप हाऊसिंग सोसायटीच्या बंद असणार्‍या पाच फ्लॅटमध्ये तसेच पारिजात को-ऑप हाऊसिंग सोसायटीमध्ये मध्यरात्री तीनच्या सुमारास घरफोडी झाली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी वास्तु विहारमधील रहिवाशांशी संवाद साधत त्यांची व्यथा जाणून घेतली.
या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, मी पोलिसांशी या घटनेसंदर्भात बोललो आहे. पोलीस प्रशासनाने या संदर्भात पाठपुरावा केला पाहिजे, पण पोलिसांकडून लवकरात लवकर कारवाई करू म्हणून सांगितले जातेय. त्याचबरोबर नागरिकांना तपास चालू आहे याच्या पलीकडे काही सांगितले जात नाही. उलट मनुष्यबळ अपुरे हे कारण दिले जात आहे. हे सगळे जे दिसतेय ते पाहता पोलीस प्रशासन या अशा पद्धतीच्या संवेदनशील घटनांच्या बाबतीमध्ये संवेदनशील नाही असे जाणवत आहे. नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव करून देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. यामध्ये खारघर पोलीस कमी पडतात असे दिसतेय आणि ही चिंताजनक बाब असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply