खारघर : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या खारघरमधील नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनजवळच्या मैदानावर टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुरबी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकाविले. गोल्डन ईगल अ संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला होता. या क्रिकेट स्पर्धेला महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक प्रवीण पाटील, भाजप खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, भरत कोंडाळकर, अर्चना बागल, मंजू चोप्रा, दीपा पिल्लाई यांच्यासह इतर पदाधिकारी व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
पारितोषिक वितरण समारंभात नगरसेविका नेत्रा पाटील यांनी उपस्थित सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व मैदानी खेळ खेळून तंदुरुस्त होऊया, असा संदेश दिला. खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले व दरवर्षी टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करूया, असे आश्वासित केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पनवेल टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संदीप पाटील खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे गिरीश केणी, सुमित गायकवाड, गोपाल राजपूत, आदित्य हाटगे यांनी मेहनत घेतली.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper