पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाच्या वतीने खारघर से. 23 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 3) करण्यात आले होते. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. दरम्यान, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या शिबिरास भेट देत शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक रामजी बेरा, प्रवीण पाटील, नगरसेविका नेत्रा पाटील, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाचे खारघरचे अध्यक्ष प्रवीण पटेल, उपाध्यक्ष अंबाभाई पटेल, वालजी गामी, नरसिंह रावत, रमेश पटेल, मनजी पटेल आदी उपस्थित होते. या शिबिरात 115 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. रक्तदान करणार्यांना सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper