

पनवेल ः रामप्रहर वृत्त
दरवर्षीप्रमाणे भारतीय जनता पार्टी खारघर यांच्यावतीने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ विद्यार्थी, नागरिक आणि गरजूंसाठी वेगळ्या प्रकारचे दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखले वाटप शिबिर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे नुकतेच घेण्यात आले. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल इत्यादी दाखले बनविण्यासाठी हजारो खारघरवासियांनी उत्साहाने शिबिराचा लाभ घेतला. आठवडाभरातच तहसील कार्यालयातून दाखले सेक्टर 3च्या खारघर भाजप मध्यवर्ती संपर्क कार्यालयात आणून त्यांचे वितरण चालू आहे.
या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठत्वाचा दाखला मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज केले होते. साधारण दोनशेच्या आसपास दाखले बनवून 26 जून 2019 या दिवशी खारघर सेक्टर 13 च्या कार्यालयात त्यांचे मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना वाटप करण्यात आले. या वेळी अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले. या कार्यक्रमास खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, सरचिटणीस गीता चौधरी, महिला मोर्चा सरचिटणीस, मोना अडवाणी, सचिव कुणाल संघाणी, रंजना जाखड, महिला मोर्चा उपाध्यक्षा अनिता जाधव, वैशाली प्रजापती, ज्येष्ठ नागरिक सेल खारघरचे अध्यक्ष नवनितजी मारु, भरत पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. खारघर शहर सरचिटणिस गिता चौधरी या तहसील कार्यालयात पाठपुरावा करीत दाखले जलद मिळवण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper