
खारघर ः येथील लिटील व्हर्ल्ड मॅलसमोर सिडकोच्या माध्यमातून टॅक्सी स्टँड मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न केल्याने हे काम मंजूर झाले. त्याबद्दल शिवसेऩा उपमहानगर प्रमुख गुरुनाथ पाटील, तसेच टॅक्सी स्टॅण्डच्या सभासदांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले. या वेळी नगरसेवक नीलेश बावीस्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper