Breaking News

खारघर वसाहतीमध्ये महायुतीच्या प्रचाराचा जोरदार धडाका

पनवेल : वार्ताहर

 खारघर वसाहतीमध्ये तसेच परिसरातील आदिवासी वाड्यांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा धडाका जोरदारपणे सुरू असून, मोठ्या प्रमाणात महायुतीचे पदाधिकारी जनसंपर्काद्वारे श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. भर उन्हामध्ये महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचाराला लागले असून, कोणत्याही परिस्थितीत श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी करायचे हे ध्येय निश्चित करून महायुती कामाला लागली आहे. खारघर तसेच आजूबाजूच्या परिसरातील धामोळावाडी, हैदरवाडी या ठिकाणी जाऊन माजी सरपंच व माजी उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आदिवासी वाड्या पिंजून काढत आहेत. या वेळी ठिकठिकाणी जाऊन ते धनुष्यबाणाचा प्रचार करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे खारघर वसाहतीमधील महत्त्वाचे असे इस्कॉन मंदिर येथेसुद्धा जाऊन या पदाधिकार्‍यांनी तेथील प्रमुखांची भेट घेऊन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. एकंदरीत निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढत आला असून, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता प्रचारासाठी ठिकठिकाणी फिरताना दिसत आहेत.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply