
पेण : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर पेण तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओघ वाढला असून, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खारपाले येथील कार्यकर्त्यांनी रवीशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन भाजपत प्रवेश केला.
खारपाले गावातील नरेंद्र किसन पाटील, मधुकर शिवकर, प्रभाकर म्हात्रे, सुभाष पाटील, हर्षद पाटील, प्रविण पाटील, सचिन पाटील, सदानंद पाटील यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपचे कमळ हाती घेतले.
रवीशेठ पाटील हे जनसामान्यांसाठी धावून जाणारे नेते असून, त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव आम्हाला आहे. त्यांच्या मागे ठाम उभे राहून खारपाले भागात महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना भरघोस मतदान होण्यासाठी प्रयत्न करू, असे या वेळी मधुकर शिवकर यांनी सांगितले.
भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, अॅड. प्रशांत पाटील, विभागीय अध्यक्ष वासुदेव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper