Breaking News

खारपाले टाक्याचीवाडी येथील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पेण ़: प्रतिनिधी

तालुक्यातील खारपाले ग्रामपंचायत हद्दीमधील टाक्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे नेतृत्व स्वीकारत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी पक्षात स्वागत केले. या वेळी खारपाले ग्रामपंचायत सदस्य राजेश तुकाराम शिवकर, डॉ. रवींद्र केणी, नरेश म्हात्रे, रामदास शिवकर आदी उपस्थित होते. या वेळी टाक्याचीवाडी येथील बारक्या वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, तांबड्या पवार, मधुकर पांडुरंग पवार, केशव बारक्या वाघमारे, बाबू हाडक्या वाघमारे, नितीन हिरामण पवार, रोहिदास भिवा पवार, अंकुश संतोष वाघमारे, सुरज पवार, प्रकाश पवार, विजय वाघमारे, वासुदेव वाघमारे, सुनील शिमग्या पवार, किशोर तुकाराम ठाकूर, ओंकार तांबड्या पवार, सुरेश पोशीराम पवार, अजय चंद्रकांत वाघमारे, नितीन दत्ताराम पवार, संजय कैलास वाघमारे यांच्यासह त्यांच्या समर्थक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Check Also

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा …

Leave a Reply