गेले कित्येक वर्षे अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील खारबंदिस्तीची कामे नकेल्यामुळे समुद्राचे खारे पाणी घुसून हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. समुद्राला उधान आले की खारेपाटात पाणी शेतात घूसते. उधानाचे पाणी शेतातून आता लोकवस्तीपर्यन्त येऊ लागले आहे. हेे असेच सुरू राहीले तर अलिबाग तालुक्यातील खारेपाट पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या भागातील काही खारबंदिस्तींच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. पंरतु तांत्रिक अडचणींमुळे कम सरु झालेली नाहित. याबाबत शासनाने ताडीने निर्णय घऊन खारबंदिस्तीची कामे करायला हवीत.
खारेपाट भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता.खारबंदिस्ती फुटून सतत खारे पाणी भातशेतीत शिरते . या पाण्यामुळे खारेपाटातील शेती उध्वस्त होत आहे. रेवस, हाशिवरे, कावाडे, सोमकोठा, रामकोठा, मल्हार कोठा, नारंगीखार, मानकोळेखार, शिरवली, चिंचवली परिसरातील सुपिक जमिनी मोठया प्रमाणात खार्या पाण्याने प्रभावित झाल्या. आजमितीला फार थोडेच शेतकरी आपली शेती वाचवून आहेत. भातशेती पिकविण्यासाठी होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. उत्पन्ना पेक्षा खर्चच अधिक होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बांधबंदिस्तीची येथे दयनिय अवस्था झाली आहे.
पावसाळयात, तसेच आमावस्या, पौर्णिमा या काळात उधाणाचा मारा मोठया प्रमाणात होतो. बांहेरकोठे फुटून उधाणाचे पाणी आता लोकवस्तीपर्यन्त पोहचू लागले आहे.गावांमध्ये पाणी शिरते, परिणामी शेतकर्यांना भातशेती बरोबर आपली घरेदारेही वाचविण्यासाठी कसरत करावी लागते. मागील आठवड्यात आलेल्या उधानमुळे धेरंडमध्ये लोकांच्या घरीत उधाणाचे पणी घुसले. लोकांचे नुकसान झाले. मागील काही महिन्यांमध्ये या परिसारत उधाणाचे पाणी घूसले होते. उधाणाच्या पाण्याने शेती नापिक झोली. आता आपले घरदेखील जाण्याच्या भितीने या खारेपाटातील शेतकर्यांची झोप ऊडालीआहे.
या भागातील शेतकरी केवळ भातशेतीवर अवलंबून नाही तर अनेकांच्या बागायती आहेत, परंतु त्यावरही खार्या पाण्याचा दुष्परीणाम जाणवत आहे. खारेपाटातील बांधबंदीस्तीचा प्रश्न शासनाने गांभिर्योन घेतला नाही तर भिविष्यात खारेपाट उध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलिबाग तालुक्यामधील काही खारबंदीस्तींच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. पंरतु तांत्रिक डचणींमुळे कामाला सुरूवात झालेली नाही. अलिबाग तालुक्यामध्ये एकूण 35 खारबंदीस्ती आहेत. त्यापैकी शहापूर, चरी -कोपर, रामराज, भिजलीबोरघर, वासखार, हाशिवरे खारबंदिस्ती खाजगी आहेत. काही खारबंदीस्ती जुन्या आहेत. त्या फुटण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी शेतकर्यांनी डागडूजी केली आहे. या खारबंदीस्तीं फुटून उधाणाचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसून शेतकर्यांचे नुकसान होते. काही ठिकाणी शेतकरी आपल्या पधातीने खारबंदीस्तीे दुरूस्ती करतात. परंतु या मोठ्या खारबंदीस्ती असल्यामुळे त्यांच्या दुरूस्तीचा खर्च शेतकर्यांना परवडणार नाही. शासनाने त्यांची दुरूंस्ती करायला हवी. अलिबाग तालुक्यातील खारबंदीस्ती फुुटत असतात. शेतकरी त्यांना जमेल तसे त्या दुरूस्त करतात. मानकुळे , कावाडे, शाहापूर, बहिरीचापाडा येथील खारबंदीस्ती फुटून उधाणाचे पाणी शेत जमिनीमध्ये घुसत असते.
धेरेंड – शहापूर परिसारातील काही शेतकर्यांनी 12 वर्षापूर्वी विद्युत प्रकल्पासाठी आपल्या जमीन विकल्या होत्या. त्या जमीनी एमआयडीसीकडे वर्ग केली. त्यामुळे येथील खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. खारबंदिस्ती दुरुस्तीची दुरुस्ती न केल्यामुळे धेरंड, मोठे शहापूर,धाकटे शहापूर या तिन्ही गावांना समुद्राच्या भरतीचा पाणी घुसल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . जर हीच परिस्थिती राहिली तर गावात उधाणाचे पाणी शिरत राहणार. खारबंदिस्ती फुटण्याची अनेक कारणे आहेत. या बंदिस्ती फार वर्षांपूर्वी बांधलेलया आहेत. त्यामुळे त्या फटतात. त्याचबरोबर समुद्रात व खाड्यांमध्ये होत असलेल्या भरावांमुळे पाण्यची पातळी वाढते. पाण्याच्या प्रवाहामुळे खारबंदीस्ती फुटते.खेकड्यांनी खोदलेल्या बिळांमध्ये पाणी घूल्यामुळे खारबंदीस्ती फुटते. पुढील धोका विचारात घेऊन राज्य शासनाने खारबंदीस्तीची कामे केली पाहिजेत. जिथे आवश्यक आहे तीथे नवीन बांधबंदिस्ती केली पाहिजे. ज्याठिकाणी बांधबंदिस्तीची दुरूस्ती होण्यासरखी आहे तेथे तातडीने दुरूस्तीची कामे करायला हवीत. त्यामुळे पुढील धोका टळता येईल. उधाणाचे पाणी घरात धुसून नुकसान झाल्यास किंवा शेतीचे नुकसान झाल्यास नैसर्गिक उपत्तीम्हणून नुकसानभरपाई दिली जात नाही. ती मिळावी अशी येथील शेतकर्यांंची मागणी आहे. तीचा विचार राज्यशासनाने करायला हवा.
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper