Breaking News

खालापुरात अपघातामध्ये तिघांचा मृत्यू

खालापूर : प्रतिनिधी
खोपोली ढेकू औद्योगिक वसाहतीतील कमानी आईल कंपनीमधून खाद्यतेल घेऊन जाणार्‍या टँकरने झोराबियन कंपनीच्या चिकनवाहक टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 29) सायंकाळी 5च्या सुमारास खोपोली-पेण मार्गावरील साजगाव फाटा येथे झाला.
या अपघातात टेम्पोचालक सागर कांबळे, अनसर पठाण आणि जांबरुंग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सीताराम कातवार (वय 55) यांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीला खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply