चार बारबालांसह व्यवस्थापकावर गुन्हा
खोपोली : प्रतिनिधी
कलोते गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या पुनम ऑर्केस्ट्रा बारवर पोलीसांनी छापा टाकला. या वेळी अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नृत्य करीत आरडाओरडा करणार्या चार बारबालांसह बारच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हॉटेलसाठी दिलेल्या परवान्याच्या अटी व शर्तीचे उल्लंघन पूनम ऑर्केस्ट्रा बारमध्ये होत असल्याची तक्रार खालापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी सार्वजनिक शांततेचा आणि नियमांचा भंग करीत बार सुरू असल्याने कारवाई करण्यात आली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि युवराज सूर्यवंशी हे करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper