खालापूर : रामप्रहर वृत्त
वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आणि केप्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 27) खालापूर तालुक्यातील वाशिवली वाडी साई नगर येथे जनजाती समाजातील 75 जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात झाला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि.चे विश्वस्त बेनी प्रसाद राऊका, सीएसआर नीता जोशी, राहूल रसाळ, वनवासी कल्याण आश्रमाच्या कोकण प्रांत अध्यक्ष ठमाताई पवार, कल्याण प्रांत उपाध्यक्ष सोनू म्हसे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी वधू-वरांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper