सलग सुट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी
खोपोली : प्रतिनिधी
सेकंड सॅटरडेला लागून चार दिवस सुट्या असल्याने चाकरमानी व अन्य कुटुंबे मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शनिवारी (दि. 13) द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने होती. खालापूर टोल नाक्यावर तर दोन्ही बाजूला किमान दोन-तीन किमी अंतराच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
अचानक वाहनांची वाढलेली संख्या बघता खंडाळा घाट क्षेत्रात धीम्या गतीने वाहतूक सुरू असून, कोणताही अपघात किंवा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलीस, द्रुतगती मार्गावरील सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून, वाहतूक सामान्य राहण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. त्यांच्या मदतीला खोपोलीतील सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही सक्रिय आहेत. द्रुतगती मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असून, कोणतीही दुर्घटना नसल्याने खंडाळा घाटातील वाहतूक धीम्या गतीने पण सुरळीत सुरू आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper