Breaking News

खालापूर पोलीस स्टेशन, चित्रकला, निबंध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या मुलांना सन्मान देऊन गौरव

खोपोली : प्रतिनिधी

पोलीस स्मृतिदिनानिमित्त खालापूर पोलीस ठाण्याने घेतलेल्या निबंध स्पर्धेत अन्विता राम लबडे हिने तर चित्रकला स्पर्धेत हर्ष संजय जाधव (आंबिवली) याने प्रथम क्रमांक पटकावला.

खालापूर पोलीस ठाण्याने पोलीस स्मृतिदिनानिमित्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी 27 ऑक्टोबर रोजी कोरोना योद्धा पोलीस या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धा घेतली होती. शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात घेतलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील 55 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. चित्रकला स्पर्धेत कनक जगदीश मरागजे (वडवळ) याने दुसरा, तर काव्य महेश पिंगळे (कांढरोली) याने तिसरा क्रमांक मिळविला.

निंबध स्पर्धेत तेजस्विनी आप्पासाहेब शिरतोडे हिचा द्वितीय, तर प्रसन्न प्रशांत गोडसे याचा तिसरा क्रमांक आला. विजेत्या विद्यार्थ्यांना खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभुते यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रे देऊन गौरवण्यात आले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply