Breaking News

खासदार श्रीरंग बारणे यांचा आज जाहीर सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुका भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांचा जाहीर सत्कार शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात येणार आहे.

राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील, समन्वयक अनिल चव्हाण, शशांक कामत, रिपाइं कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे, संघटक प्रथमेश सोमण आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.या सभारंभास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुकाप्रमुख परेश पाटील, शहर प्रमुख अच्युत मनोरे व महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply