पेण : रामप्रहर वृत्त
हरियाणातील पंचकुला येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पेण तालुक्यातील रावे येथील खेळाडू आर्यन अरुण पाटील याने उंच उडीत रौप्यपदक पटकाविले. याबद्दल त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मंगळवारी (दि. 8) पदकांची लयलूट केली. यात रायगडच्या आर्यन पाटीलने 2.04 मीटर उंच उडी मारून रौप्यपदक जिंकले. महाराष्ट्राने मंगळवारी 11 सुवर्णपदकांसह एकूण 20 पदके कमावली. याच बळावर महाराष्ट्राने (24 सुवर्ण, 22 रौप्य, 17 कांस्यपदके) हरयाणाला मागे टाकत पुन्हा गुणतालिकेत अग्रस्थान प्राप्त केले आहे.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper