Breaking News

खोपोलीत आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्ध्यांचा सन्मान

तब्बल 700 जणांचे शिबिरात रक्तदान

खोपोली : प्रतिनिधी

बुऽऽज् हास्य क्लबचे संस्थापक बाबूभाई ओसवाल यांच्या संकल्पेनूत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला खोपोलीतील लोहाणा समाज सभागृहात घंटागाडी कामगारांचा तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या वेळी आयोजित केलेल्या शिबिरात सुमारे 100 दात्यांनी रक्तदान केले. कोरोना बाधितांना उपचारासाठी मदतकार्य करणार्‍या तात्कालिन नगराध्यक्षा सुमन औसरमल, माजी नगरसेवक मोहन औसरमल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजीक संस्थेचे गुरूनाथ साठेलकर, सहज फाउंडेशनचे शेखर जांभळे, नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता वानखेडे यांच्यासह नगरपालिकेच्या घंटागाडीवर काम करणार्‍या कामगारांना या वेळी कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुऽऽज्  हास्य क्लब आणि समर्पण रक्तपेढी-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या वेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात 100 दात्यांनी रक्तदान केले. आमदार महेंद्र थोरवे,  हभप रामदास पाटील महाराज, दीपेंद्रसिंह बधोरिया, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर, सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, माजी नगरसेवक मनिष यादव, भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, अतुल पाटील, उद्योजक हरीष काळे, अबूशेठ जळगावकर, बुऽऽज् हास्य क्लबचे अध्यक्ष संस्थापक बाबूभाई ओसवाल, अध्यक्ष कुलवन सिंग, सदस्य हेमंत नांदे, जयमाला पाटील, विनायक तेलवणे, भास्कर लांडगे, चंद्रकांत केदारी यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply