खोपोली : प्रतिनिधी
सोमजाई मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाने खोपोली शहरातील बहुचर्चित काशी होम्स दहीहंडी फोडून रोख एक लाख 11 हजार व मानाचा चषक पटकावला. विजेत्या गोविंदा पथकाला काशी होमचे विक्रम साबळे, यशवंत साबळे आणि माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक प्रदान करण्यात आला.
खोपोली शास्त्रीनगर गुरुद्वारा येथे काशी होम तर्फे शुक्रवारी दहीहंडी उभारण्यात आली होती. यावर्षी शिंदे, फडणवीस सरकारने गोविंदा पथकांना विमा कवच देण्याची घोषणा केल्याने तर गोविंदा पथकांमध्ये अधिक उत्साह संचारला होता. खालापूरचा साबईमाता मित्र मंडळ, खालची खोपोली येथील शिवशक्ती मंडळ, वरची खोपोली येथील वीरेश्वर मंडळ व सोमजाई माता मित्र मंडळ यांच्या गोविंदा पथकांनी काशी होम्स दहीहंडी महोत्सवात हजेरी लावून पाच थरांची सलामी दिली. सलामी देणार्या गोविंदा पथकांनाही रोख पारितोषिक देण्यात आली. या दहीहंडी महोत्सवाला आमदार महेंद्र थोरवे, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, डॉ. सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगरसेवक सूर्यकांत देशमुख, माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल, माधवी रिटे, नगर परिषदेचे प्रशासक अनुप दुरे, खालापुरच्या माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम, केटीएसपी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यावाह किशोर पाटील, संचालक दिलीप पोरवाल, अबू जळगावकर, तसेच अतुल पाटील, प्रशांत कोठावळे, राजू गायकवाड, रॉबिन सॅम्यूअल, सुहास वझरकर, नईम मुक्री, ईश्वर शिंपी, चंद्राप्पा अनिवार, संतोष मालकर, रमेश मोगरे, अॅड. राजेंद्र येरुणकर यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दहावी व बारावी परीक्षेत खोपोली प्रथम आलेल्यांचा तसेच सामाजिक कार्यकर्ते अतिकभाई खोत, यशवंती हायकर्सचे सगळगिळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मारुती आडकर यांना आमदार थोरवे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले.
काशी होम्स दहीहंडी फोडण्याचा मान सोमजाई मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाने पटकावला. या गोविंदा पथकास, रोख एक लाख 11 हजार व काशी होम चषक देण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper