Breaking News

खोपोलीत निषेध आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा खोपोलीतील कार्यकर्त्यांनी बुधवारी हातात फलक घेवून आपल्या घराबाहेर निषेध केला.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर   तृणमूल काँग्रेसचे गुंड भाजप कार्यकर्त्यांवर खुनी हल्ले करीत आहेत. या हल्ल्याचा तसेच याबाबत मूग गिळून गुपचूप बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करण्याचे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केले होते. त्यानुसार खोपोली शहर सरचिटणीस ईश्वर शिंपी, महिला मोर्चाच्या स्वाती बिवरे, सुनिता पाटणकर ,रूपाली कुंटे, बावस्कर, रसिका शेटे, राजन शेटे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेऊन बुधवारी निषेध आंदोलन केले.

पेणमध्ये तहसीलदारांना निवेदन

पेण : प्रतिनिधी

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांवर जीवघेणे हल्ले करण्यात येत आहेत, त्याचा निषेध करून पेण तालुका भाजप तर्फे बुधवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

नुकताच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पश्चिम बंगालमधील सुमारे अडीच कोटी मतदारांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले असून भाजपचे 76 आमदार निवडून आले आहेत. भाजपचे हे यश असह्य झाल्याने तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी भाजप कार्यकत्यांची हत्या करणे, घरे जाळणे असे माणुसकीला व लोकशाहीला कलंक लावणारे प्रकार सुरू केले आहेत. त्यात आतापर्यंत 300 भाजप कार्यकर्त्यांचे बळी गेले आहेत. त्याचा निषेध करून पेण तालुका भाजपने बुधवारी तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, पेण तालुका महिला मोर्चा अध्यक्षा सुप्रिया चव्हाण, राकेश म्हात्रे, रवींद्र म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलादपूरमधील तहसीलदारांना निवेदन

पोलादपूर : प्रतिनिधी

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात पोलादपूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिले. निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसन्ना पालांडे आणि महिला मोर्चा शहर संघटक उज्ज्वला शेठ यांच्याहस्ते हे निवेदन स्वीकारले.

भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजू धुमाळ, पोलादपूर शहर अध्यक्ष राजा दिक्षीत, तालुका सरचिटणीस पंकज बुटाला, युवा मोर्चा रायगड जिल्हा चिटणीस महेश निकम, रायगड जि. प. चे माजी सदस्य अनिल नलावडे, नितीन बोरकर, संतोष कासार, राजा जांभळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply