Breaking News

खोपोलीत वनखात्याची कारवाई ; भानवज-काजूवाडी मार्गावरील 19 बांधकामे जमीनदोस्त

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली शहरातील भानवजकडे जाणार्‍या मार्गावर वन विभागाच्या जमिनीमध्ये अनेकांनी अनाधिकृत टपर्‍या आणि पत्र्याच्या शेड उभारल्यामुळे वाहतुकीला अढथळा निर्माण झाला होता. वनखात्याच्या अधिकार्‍यांनी पोलीस खात्याला बरोबर घेऊन येथील सुमारे 19 अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.  

शहरातील भानवजकडे जाणार्‍या मार्गावर वनखात्याच्या जागेवर अनाधिकृतपणे बांधकाम केल्याने या ठिकाणाहून जाताना वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते. त्याची दखल घेत अलिबाग येथील उप वनसंरक्षक मनीष कुमार यांच्या आदेशानुसार खालापूर वनविभागाने तेथील सुमारे 19 अनाधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply