Breaking News

खोपोली-पेण मार्गावर कारला टँकरची धडक

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली-पेण मार्गावर शनिवारी (दि. 18) भरधाव टँकरची प्रवासी इको कारला धडक बसून झालेल्या अपघातात इको चालकासह पाच प्रवासी जखमी झाले.

पेण येथून खालापूर हद्दीत असलेल्या पारले कारखान्यातील कामगारांना घेऊन शनिवारी सकाळी इको जात असताना, आपटी गावाच्या हद्दीत समोरून ओव्हरटेक  करत आलेल्या टँकरने इकोला धडक दिली. सुदैवाने एअर बॅग असल्याने इको चालक बचावला, मात्र त्याच्यासह इकोमध्ये बसलेले विशाल पाटील (रा. हमरापूर, ता. पेण), महेश देवधर (पेण), मारुती भिसे (सध्या रा. गोरठण-वावोशी, ता. खालापूर), विनोद भगत (हमरापूर-पेण) प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply