पनवेल ः वार्ताहर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने शुक्रवारी (दि. 26) तालुक्यातील कोन, सावळा रोड सोमटणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू पथकाने रंगीत तालीम केली.
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत आगामी गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने कोन, सावळा, रोड सोमटणे येथे दंगा काबू पथकातर्फे रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले होते. या रंगीत तालीममध्ये पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, 21 पुरूष, महिला पोलीस अंमलदार हजर होते. त्याचप्रमाणे नवीन पनवेल फायर ब्रिगेडचे एक अधिकारी, चार कर्मचारी, बिट मार्शलचे पोलीस अंमलदार सहभागी झालेले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper