Breaking News

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांचे आवाहन

खोपोली : प्रतिनिधी

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या शक्यतेमुळे गणेशोत्सवात नियमांचे पालन करा, असे आवाहन खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी बुधवारी (दि. 1) खालापूर येथे केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खालापूर येथील नेताजी पालकर सभागृहात बुधवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. या बैठकीत गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच शासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बैठकीला खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply