गतिमंद मुलगी कुटुंबीयांकडे सुपूर्द

पनवेल : वार्ताहर

आपल्या नातेवाईकांकडे राहण्यास आलेली एक गतिमंद मुलगी घरचा रस्ता चुकल्याने फिरत असताना याबाबतची माहिती तालुका पोलिसांच्या पथकास मिळाली. त्यांनी तत्काळ या मुलीला ताब्यात घेऊन परिसरात शोध घेऊन तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मीलन राजाराम चोरगे (वय 29, वाकडी, पनवेल) यांना एक मुलगी वय वर्ष अंदाजे 13 ही वाकडी येथे फिरत असताना आढळली. त्यांनी तिला पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. दरम्यान, वाकडी गावाजवळ काही जण एका मुलीचा शोध घेताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी मोबाइलमधील मुलीचा फोटो दाखविला असता हीच मुलगी हरवलेली असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांची योग्य ती खात्री करून मुलीस तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले. अल्पवयीन व गतिमंद मुलीस पोलिसांनी सुखरूपपणे तिच्या आईच्या ताब्यात दिल्याने तिची आई व नातेवाईकांनी पनवेल तालुका पोलिसांचे आभार मानले.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply