लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्ताने, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लॉकडाऊनमध्ये गरजवंत नागरिकांना घरी जाण्यासाठी मोफत रिक्षा सेवा देण्यात येत आहे. या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
ही सेवा नागरिकांसाठी सुस् झाली असून गरजवंतांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी नागरिकांना केले आहे. या वेळी रिक्षांना याबाबत स्टिकर लावण्यात आले असून त्याठिकाणी याबाबत बॅनरदेखील ठेवण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात नवीन पनवेल रेल्वे स्टेशन येथे करण्यात आली असून या वेळी नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, विजय दुन्द्रेकर, सुरेश भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने साजर्या करण्यात येणार्या कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाची नोंद होत आहे. यामुळे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लॉकडाऊनमध्ये दररोज 70 गरजवंत कामगारांना घरी सोडण्यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे कटिबद्ध असेल.
RamPrahar – The Panvel Daily Paper