Breaking News

गरीबाच्या कल्याणात आडवा येणारा कायदा तोडण्याचा आम्हाला अधिकार -ना. गडकरी

नागपूर : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गरीबाच्या कल्याणात आडवा येणारा कायदा तोडण्याचा अधिकार आम्हा मंत्र्यांना असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या नागपूर शाखेने आदिवासींच्या आरोग्यासाठी ब्लॉसम नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रात 1995मध्ये मंत्री होतो. त्या वेळी मी मुंबईत अनेक रस्ते, पूल बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसे करताना अडचणी आल्या. या भागात कुपोषणामुळे दोन हजार मुलांचा मृत्यू झाला. तेथील 450 गावांना रस्ते नव्हते. त्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. खूप प्रयत्न केले, आयुक्तांनी सांगितले, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. त्यामुळे खूप त्रास झाला. या भागात अनेक लोक मागासलेली होती. त्यामुळे वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने नंतर प्रश्न सोडवला.
मी नेहमी अधिकार्‍यांना सांगतो की, तुम्ही म्हणाल तसे सरकार चालणार नाही. तुम्ही फक्त आम्ही म्हणतो त्याची अंमलबजावणी करायची हे लक्षात ठेवा, असेही ना. गडकरींनी या वेळी म्हटले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply