पनवेल ः रामप्रहव वृत्त
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छात्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये उद्या बुधवारी (दि. 25) सकाळी 10: 30 वा. संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 132वा जयंती सोहळा व पारितोषिक वितरण सोहळा संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विद्यालयाच्या प्रांगणात होणार्या या सोहळ्यास जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर अण्णांच्या जीवन चरित्रावर प्रकाशझोत टाकण्यासाठी नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार जाधव यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले असून या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महेंद्रशेठ घरत, गव्हाणच्या सरपंच हेमलताताई भगत, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभाताई घरत, संस्थेच्या रायगड विभागाचे इन्स्पेक्टर एस. जे. मोहिते, सहाय्यक इन्स्पेक्टर शहाजी फडतरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व जनरल बॉडी तसेच समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत, प्राचार्या साधना डोईफोडे यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper