Breaking News

गव्हाण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

गव्हाण : रामप्रहर वृत्त

येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील इयत्ता आठवीत शिकणार्‍या नऊ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेतील प्राविण्याबद्दल सलग चार वर्षे प्रत्येकी 12 हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. अर्थात प्रत्येक विद्यार्थ्याला 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल. गतवर्षी चार विद्यार्थी पात्र ठरले होते. या वर्षी नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.

या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विद्यालयाचे आधारस्तंभ, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत, शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, संस्थेचे आजीव सदस्य प्रमोद कोळी, लाईफ वर्कर रविंद्र भोईर आदींनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या सर्व अध्यापकांचे अभिनंदन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अथक वस्तुनिष्ठ मार्गदर्शन करणारे व विशेष ’राशीन पॅटर्न’ राबविणारे उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे तसेच सातत्याने रचनात्मक मार्गदर्शन करणारे या स्पर्धात्मक परीक्षा विभागाचे विभाग प्रमुख प्रदीप काकडे व द्रौपदी वर्तक यांचे विद्यार्थी व पालकांकडून विशेष अभिनंदन होत आहे.

या विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ तर होईलच परंतु त्याहीपेक्षा स्पर्धा परीक्षांसाठी त्यांचा दुनावलेला आत्मविश्वास ही मोठीच जमेची बाजूअसल्याचे प्रतिपादन विभागप्रमुख प्रदीप काकडे यांनी केले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply