Breaking News

गव्हाण विद्यालयात संत गाडगेबाबांना अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये लोकसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते पूजन अभिवादन करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलितोद्धार कार्याने आणि पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गोरगरीब बहुजनांच्या लेकरांना शिक्षण देण्याच्या महत्त्वाकांक्षी स्वावलंबनात्मक शैक्षणिक कार्याने प्रभावित होऊन गाडगेबाबांनी त्यांच्यातील माणसातले देवपण जनताजनार्दनासमोर मांडले. अशा महान लोकप्रबोधनकार लोकसंत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.

या वेळी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य आणि रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी, संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वित समिती सदस्य रवींद्र भोईर, उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, परीक्षा विभाग प्रमुख चित्रलेखा पाटील,

गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, उपशिक्षिका हर्षला पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply