Breaking News

गव्हाण विद्यालयात सर्प प्रतिकृतींचे प्रदर्शन

गव्हाण ः रामप्रहर वृत्त

 येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये नागपंचमी सणाच्या निमित्ताने गुरुकुल प्रकल्पांतर्गत केअर ऑफ नेचर या संस्थेचे सदस्य प्रा. संदेश घरत यांचे सर्प विज्ञान अर्थात सापांविषयी समज व गैरसमज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कॉनचे समन्वयक तुकाराम शिंदे यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व गुरुकुल प्रकल्प यांच्या वतीने बाह्यतज्ज्ञ मार्गदर्शक या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्या साधना डोईफोडे यांनी भूषविले. प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त करणार्‍या विद्यार्थिनी दीक्षा वर्तक (5वी ब) व साक्षी पाटील (9वी क) यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी, प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योत्स्ना ठाकूर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सागर रंधवे यांनी, तर ज्योत्स्ना ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply