Breaking News

गव्हाण विभागात विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि आपल्या आई-वडिलांचे, शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गव्हाण विभागत वह्या वाटपावेळी केले.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली 30 वर्षे उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उलवे नोड यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण विभागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 27) झाला. या अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या शिवाजीनगर, कोपर, शेलघर, बेलपाडा आणि गव्हाण कन्या आणि रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील, रतनशेठ भगत, अनंता ठाकूर, गव्हाण विभागीय अध्यक्ष अध्यक्ष निलेश खारकर, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, सुधीर ठाकूर, वामनशेठ म्हात्रे, विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच माई भोर्ईर, माजी उपसरपंच विजय घरत, सचिन घरत, वहाळचे माजी उसरपंच अमर म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, उषा देशमुख, हेमंत पाटील, भूषण म्हात्रे, श्री राम मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष महादेव कोळी, मच्छीमार को-ऑपरेशन सोसायटीचे चेअमन चंद्रकांत कोळी, महिला मोर्चा अध्यक्ष निकिता खारकर, सुहास भगत, अजय भगत, विनायक कोळी, राजकिरण कोळी, वैभव घरत, रोशन म्हात्रे, राजेंद्र भगत, संतोष म्हात्रे, गणेश पाटील, अरिष पाटील, मधुकर पाटील, तुकारम ठाकूर, प्रकाश कडू, अशोक घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply