Breaking News

गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक

पनवेल : वार्ताहर

गांजा जवळ बागळल्याप्रकरणी तिघा जणांना तक्का परिसरातून विशेष पथकाने आज ताब्यात घेतले आहे. तक्का परिसरातील काही इसमांजवळ गांजा असल्याची खबर अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला मिळताच या पथकाचे प्रमुख पोेलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी सदर ठिकाणी सापळा रचून या तिघा इसमांना ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडून गांजा हस्तगत केला आहे. यांच्या अटकेमुळे पनवेल परिसरात कोणामार्फत गांजा विक्री केली जाते याची माहिती मिळणार आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply