पनवेल ः रामप्रहर वृत्त
गानसम्राज्ञी भारतरत्न, स्व. लता मंगेशकर यांना भाजप कामोठे मंडलतर्फे सोमवारी (दि. 7) पोलीस ठाण्यासमोरील चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, सरचिटणीस शरद जगताप, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भटके विमुक्त जमाती महिला सेलच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विद्या तामखडे, महिला मोर्चा उपाध्यक्ष रश्मी भारद्वाज, युवा मोर्चा उपाध्यक्ष तेजस जाधव, सरचिटणीस नवनाथ भोसले, सोशल मीडिया सेल संयोजक प्रवीण वाघमारे, युवा मोर्चा चिटणीस सुरेंद्र हळीकर, रावसाहेब बुधे, व्यापारी सेल संयोजक नाना मकदुम, आध्यात्मिक सेलचे संयोजक विनोद खेडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. सर्वांनी लाडक्या लतादीदींना आदरांजली अर्पण केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper