महाड, म्हसळा, कर्जत : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी (दि. 11) मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी झाली. काही ठिकाणी गाराही पडल्या. या वादळी पावसामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले असून शेतकर्यांच्या पिकाचीही हानी होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चढला होता. त्यामुळे उकाडा जाणवत होता. अशातच शनिवारी पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात महाड, म्हसळा, कर्जत, खालापूर, पनवेल आदी तालुक्यांमध्ये जलधारा बरसल्या. त्यामुळे वातावरणात गारवा येऊन नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी वादळी पावसाचा ग्रामीण भागाला तडाखा बसला आहे. महाडमध्ये अनेक घरांची छपरे उडून नुकसान झाले आहे, तर विविध ठिकाणी शेती, भाजीपाला, फळपीके खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper