नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गुगल भारतामध्ये डिजिटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाईल, असे पिचई यांनी स्पष्ट केले आहे. पिचई यांनी सोमवारी (दि. 13) सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली.
याबद्दल माहिती देताना गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी ट्विट करीत सांगितले की, आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेतंर्गत 10 बिलियन डॉलरच्या (75 हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करीत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला. त्यासाठी त्यांचे आभार!
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper