Breaking News

गुड न्यूज! यंदा चांगला पाऊस होणार

मुंबई : प्रतिनिधी
यंदा अल निनोसह सर्वच घटक सामान्य राहणार असल्याने सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 5 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान 96 ते 104 टक्के पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्याने वर्तविलेला हा पहिला अंदाज आहे. पावसाच्या चारही महिन्यांत अल निनोमुळे होणारा परिणाम सामान्य असेल. त्यामुळे पाऊस चांगला होईल, असे हवामान खात्याने सांगितले. इतर बहुतांश संस्थांनीही यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे, मात्र पावसाच्या दुसर्‍या टप्प्यात पॅसिफिक महासागरातील अला निनोचा प्रभाव कमी होईल, अशी शक्यता जगातील काही संस्थांनी वर्तवली असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली.
समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाचा भारतातील मान्सूनवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे हिंदी आणि पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानावर लक्ष ठेवून असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply